साहित्यिक मिञहो,
सस्नेह नमस्कार,
इंटरनेट हा शब्दच ज्याला माहित नाही असा एकही व्यक्ती या महाराष्ट्रात मिळणे म्हणजे नवलच समजावे लागेल.आपल्याला सर्वानांच इंटरनेट बद्दल थोडी फार माहिती आहेच. इंटरनेट ने आज सगळ्या जगाला जवळ आणलं आहे. आज सर्वच क्षेत्रात इंटरनेटने आपली मुळे खोलवर रुजवलेली पाहावयास मिळतात. बँक, पोस्ट ते पार शाळा व गल्लीतील किराणा दुकाणा पर्यंत इंटरनेट चा वापर होवु लागला आहे. याला साहित्यिक क्षेत्रच का बरे अपवादात्मक ठरावे म्हणुन साहित्यिक, प्रकाशकांनी देखील इंटरनेट चा स्विकार करत ईमेल, ई-पेपर, ईबुक, ब्लॉग, व्हॉट्सअँप फेसबुक च्या माध्यमातून प्रकट व्हायला सुरुवात केली आहे.
साहित्य सागर साहित्य संघाच्या माध्यमातून गेली दहा वर्ष आम्ही मराठी साहित्य सेवेसाठी खर्च केली आहेत. ई माध्यमाच्या जमान्यात साहित्यिकांच्या सेवेत आपले स्थान टिकवुन ठेवण्यासाठी आम्ही देखील ई माध्यमाचा स्विकार करत पीडीएफ स्वरुपाचे अक्षरशिल्प ई मासिक सुरु करत आहोत. हे ई मासिक आपल्या समोर सादर करताना आम्हांला अतिशय आनंद होत आहे. त्याच बरोबरीने हा अंक आपल्या कसोटीस उतरेल की नाही, अशी धाकधूक मनांत आहे.
आजच्या युगात जगाच्या कानाकोपर्‍यांत पसरलेले मराठी भाषिक आपल्या अनुभवविश्वांना वेगवेगळ्या मराठी संकेतस्थळांवरून मांडत आहेत. आंतरजालावरील अतिशय कमी खर्चात उपलब्ध सुविधांमुळे टीव्ही स्टुडिओच्या वा रेडिओ स्टेशनच्या मदतीविना, कमीत कमी तांत्रिक सामग्री वापरून दृक्‌श्राव्य कलांना सादरकर्ते प्रेक्षक-श्रोत्यांपर्यंत पोहोचवू शकत आहेत. ब्लॉग, फेसबुक अथवा व्हॉट्स अँप सारख्या संकेतस्थळांवरून शब्द डिजिटल स्वरूपात विनाविलंब वाचकापर्यंत पोहोचत आहेतच! साहित्य सागर साहित्य संघाने मुद्रण स्वरूपातील आता पर्यत चार प्रातिनिधिक काव्य संग्रह प्रकाशित केले आहेत. परंतु साहित्यिक उदासिनतेमुळे आणि माहिती व तंञज्ञानाच्या या युगात निव्वळ साहित्यासाठी असलेल्या मासिकाकडे जाहिरातदारांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे असे अंक काढणे
आता काट्यावरची कसरत होवुन बसले आहे. परंतु असे अंक काढणे अवघड झाले म्हणुन आपल्या दहा वर्षाच्या साहित्य सेवेत खंड न पाडता माहिती आणि तंत्रज्ञानाचा स्विकार करत साहित्य सागर साहित्य संघ आपले ई मराठी मासिक प्रकाशित करत आहे. सुजान साहित्यिक या मासिकाचे स्वागत करतील ही अपेक्षा.

अमोल टेकाळे
संपादक- अक्षरशिल्प ई मासिक
अध्यक्ष- साहित्य सागर साहित्य संघ

ई मासिका साठी साहित्य पाठवा.

१) मासिकासाठी कथा, कविता, चारोळ्या, गझल, लेख, पुस्तक परिचय स्विकारले जातील.
२) ' अक्षरशिल्प ' ई मासिकाचे सभासद व्हा. आणि पोहचवा आपल्या रचना हजारो वाचका पर्यंत ते ही मोफत.
३) साहित्य टाईप करुन किंवा docx फाईल मध्ये पाठवावे, pdf फाईल किंवा साहित्याचा फोटो पाठवू नये.
४) आपले साहित्य
sahitysagar1@gmail.com
या ईमेल पत्यावर पाठवावे.
५) अंक
http://sahitysagar1.blogspot.com
या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तेथुन डाउनलोडकरावा.
६) अंक डाउनलोड होत नसल्यास ९८९०३३१०१२ या व्हाॅट्स अॅप्स क्रमांकावर संपर्क साधावा.
७) आपल्याला आवडलेल्या साहित्या विषयी तसेच या मासिका बद्दल आपल्या सुचन, मत आपण मांडु शकता.
आपल्या साहित्यिक मिञांना देखिल सभासद होण्यास प्रेरित करा.